‘अरिहंत ‘च्या औद्योगिक केंद्रातर्फे बोरगावात रोजगार मेळावा : 1172 हून अधिक युवकांनी घेतला होता लाभ : झाली 500 पेक्षा अधिक युवकांची निवड

Ravindra Jadhav
‘अरिहंत ‘च्या औद्योगिक केंद्रातर्फे बोरगावात रोजगार मेळावा : 1172 हून अधिक युवकांनी घेतला होता लाभ : झाली 500 पेक्षा अधिक युवकांची निवड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निपाणी : बोरगाव येथील अरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या आर .ए .पाटील औद्योगिक केंद्रातर्फे आयोजित रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचा लाभ सुमारे 1172 हून अधिक युवकांनी घेतला. यापैकी सुमारे 500 पेक्षा अधिक युवकांची निवड करण्यात आली.
मेळाव्यात टाटा मोटर्स पुणे , फिकोकु बेळगाव, गोल्ड प्लस कणगला,सोनाटेक इचलकरंजी, अरिहंत शुगर चिक्कोडी, डेक्सरिटी ग्रुप पुणे, अनिकेत एंटरप्राइजेस, करिअर केअर , ओम मेटॅलिक गोकुळ शिरगाव, बजाज ऑटो व अरिहंत हॉस्पिटल या कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

निपाणी आणि परिसरातील अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अरिहंत उद्योग समूहाचे सातत्याने प्रयत्न असून अरिहंत बँक, सूतगिरणी, साखर कारखाना, सोसायटी, गारमेंट, डेअरीच्या माध्यमातून हजार पेक्षा अधिक युवकांना कामाची संधी दिली गेली आहे. त्याच अनुषंगाने आज रोजगार मेळावा भरविण्यात आला असून त्याचा युवकांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन सहकाररत्न उत्तम पाटील यांनी रोजगार मेळाव्यात बोलताना केले.

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरिता मार्गदर्शनाची गरज आहे. योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळाल्यास बेरोजगारांना कामाची संधी मिळणार आहे. सहकाररत्न रावसाहेब पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने युवकांसाठी वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत, असेही उत्तम पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

प्रारंभी औद्योगिक केंद्राचे प्राचार्य व्ही. बी.शिरहट्टी यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
मेळाव्यास नगरसेवक अभयकुमार मगदूम, दिगंबर कांबळे, पिंटू कांबळे ,अमर शिंगे, मनोज पाटील, महादेव उलपे ,अण्णासाहेब भोजकर, बाळासाहेब हावले, व्ही. बी. घाटगे, शीतल तोडकर, शितल हावले, मायगोंडा पाटील, हिराचंद चव्हाण, इंद्रजीत पवार, सी.ए. कोरे, नागेश पाटील, अमित मुन्नोळे, व्ही. व्ही. चौगुले, दयानंद सदलगे आदी मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article