राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मारली मराठी चित्रपटांनी बाजी : वाळवी, वारसा ची आघाडी : कांतारा, अट्टम सर्वोत्कृष्ट

Ravindra Jadhav
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मारली मराठी चित्रपटांनी बाजी : वाळवी, वारसा ची आघाडी : कांतारा, अट्टम सर्वोत्कृष्ट
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपटांनी बाजी मारली असून ‘ वाळवी ‘ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला आहे तर सचिन सुर्यवंशी यांच्या ‘वारसा’ चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार आणि ‘आदीगुंजन’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार व सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे.
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘ कांतारा ‘आणि बेस्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार ‘ अट्टम ‘ या मल्याळम चित्रपटाला देण्यात आला.

साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला . ‘ कांतारा ‘ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. नित्या मेनन आणि मानसी पारेख यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. सूरज बडजात्या यांना “उंचाई” चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला आहे तर नीना गुप्ता यांना ‘ ऊंचाई ‘ याच चित्रपटासठी बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला आहे. बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा पुरस्कार पवन मल्होत्रा यांना देण्यात आला. यश याच्या ‘ केजीएफ – 2 ‘ या चित्रपटालाही उत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला.
“ब्रह्मास्त्र” चित्रपटासाठी अरिजीत सिंह याला सर्वोत्कृष्ट मेल प्लेबॅक सिंगर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मणिरत्नम निर्देशित ‘ पोन्नियिन सेल्वन – 1 ‘ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. ऐश्वर्या राय, शोभिता धुलिपाला यांनी या चित्रपटामध्ये भूमिका वटविल्या आहेत. ‘ गुलमोहर ‘ चित्रपटासाठी मनोज वाजपेयी यांना पुरस्कार देण्यात आला.

साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ ला बेस्ट डॉक्युमेंटरी आणि बेस्ट नॅरेशन असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

उकृष्ट अभिनेता म्हणून ऋषभ शेट्टी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नित्या मेनन आणि मानसी पारेख, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार सूरज बडजात्या, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून पवन मल्होत्रा, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार कांताराला, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता प्रमोद कुमार (फौज) यांना देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – सौदी वेलाक्का, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – पीएस 1, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट -केजीएफ 2, सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कार्तिकेय 2, सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी, सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी – ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या चित्रपटांना देण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article