मराठा बँक निवडणूक : 22 रोजी होणार मतदान आणि निकाल घोषित

Ravindra Jadhav
मराठा बँक निवडणूक : 22 रोजी होणार मतदान आणि निकाल घोषित
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : येथील मराठा को-ऑप बँक लि. बेळगाव या संस्थेची निवडणूक जाहीर झाली असून येत्या रविवार दि. 22 डिसेंबर 2024 रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.
या निवडणुकीसाठी सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदार यादी अंतिम केली जाणार असून त्यानंतर शुक्रवार दि. 6 डिसेंबरपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

सामान्य वर्ग -09, महिला राखीव -02, मागास ‘अ’ वर्ग -01, मागास ‘ब’ वर्ग -01, मागास परिशिष्ट जाती -01, मागास परिशिष्ट जमाती -01 अशी एकूण 15 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.
मराठा बँक निवडणूक अधिकारी भरतेश शेबण्णावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 07-12-2024 हा इच्छुक उमेदवारांनी नामपत्र भरण्यास प्रारंभ करण्याचा दिवस असून बँकेच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. दि. 14-12-2024 हा निवडणुकीस इच्छुक उमेदवारांसाठी नामपत्र भरण्याचा अखेरचा दिवस आहे.
दि. 15-12-2024 रोजी उमेदवारांच्या नामपत्रांची छानणी केली जाणार असून बँकेच्या कार्यालयात दुपारी 12 वाजता निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकाऱ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
दि. 15-12-2024 रोजी होणाऱ्या छाननी प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या कार्यालयात प्रकाशित केली जाणार आहे.
दि.16-12-2024 ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर निवडणुकीस उभे राहिलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे. 16-22-2024 रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून पात्र उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहे.
दि.18-12-2024 रोजी दुपारी 3 नंतर बँकेच्या कार्यालयात चिन्हासहित पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 22-12-2024 रोजी मराठा बँक, बसवान गल्ली बेळगाव येथे सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान कार्यक्रम होणार असून त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article