Ad imageAd image

सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार मंचचा ‘ महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार ‘ जाहीर

Ravindra Jadhav
सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार मंचचा ‘ महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार ‘ जाहीर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : गांधी विचारांचा जागर करणाऱ्या ज्येष्ठ सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील महात्मा गांधी विचार मंचने “ महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार ” जाहीर केला आहे.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी 11 वाजता मराठी विद्यानिकेत येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. सुभाष कोरे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

समाजातील गांधीवादी, विचारवंत, कृतिशील कार्यकर्ते, समाजसेवक अशा महनीय व्यक्तींची निवड करून महात्मा गांधी विचार मंचच्यावतीने महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार असून यावर्षीच्या या पहिल्याच पुरस्कारासाठी प्रत्यक्ष महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासमवेत काही काळ कार्य केलेले कॉम्रेड कृष्णा मेणसे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, असेही प्रा. सुभाष कोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कॉम्रेड कृष्णा मेणसे यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा लढ्यात देखील ते सक्रिय राहिलेले आहेत. साराबंदी आंदोलनात त्याचप्रमाणे गोवा मुक्ती आंदोलन, कामगार चळवळ, कम्युनिस्ट चळवळ यामध्ये देखील कृष्णा मेणसे यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मागील वर्षी महात्मा गांधी विचार मंच गडहिंग्लज या संस्थेच्या वतीने गडहिंग्लज, चंदगड, आजरा या भागात विविध उपक्रमांच्या माध्यमातून महात्मा गांधींवर 75 व्याख्याने दिली आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त या भागात शाहू विचारांचा जागर करण्यासाठी 150 व्याख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये देण्याचा उपक्रम सुरू आहे असे यावेळी महात्मा गांधी विचार मंचबद्दल माहिती देताना सांगण्यात आले.

यावेळी प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, सुरेश पवार, प्रा. सुनिल शिंत्रे, सातप्पा कांबळे, अंजली रेडेकर आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article