चव्हाट गल्ली (बेळगावचा राजा) गणेशोत्सव मंडळाकडून महालक्ष्मीची महापूजा

Ravindra Jadhav
चव्हाट गल्ली (बेळगावचा राजा) गणेशोत्सव मंडळाकडून महालक्ष्मीची महापूजा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : चव्हाट गल्ली (बेळगावचा राजा) गणेशोत्सव मंडळाकडून बसवान गल्ली बेळगाव येथील बेळगावची ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरात मंगळवारी सायंकाळी सात वाजता महालक्ष्मी देवीची महाआरती व महापूजा करण्यात आली.

 

बेळगावचा गणेशोत्सव आणि चव्हाट गल्ली मंडळाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बसवान गल्ली येथील महालक्ष्मी मंदिरात देवीची महाआरती व महापूजन केली. याप्रसंगी देवीला साडी चोळी आणि लाडूचा प्रसाद अर्पण करून महाआरती करण्यात आली.

चव्हाट गल्लीचे आराध्य दैवत जोतिबा तसेच महालक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने चव्हाट गल्ली गणेशोत्सव मंडळाचा उत्सव सोहळा निर्विघ्नपणे पार पाडला. यामुळे मंडळाच्यावतीने महालक्ष्मीची ओटी भरण्याचा हा सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि गल्लीतील गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article