बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्यावतीने निराधार मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शांता कोलकार ही 70 वर्षीय महिला जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामध्ये कित्येक वर्षापासून वास्तव्यास होती. गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने सरकारी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही माहिती निराधार केंद्राचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांना सांगितली.
माधुरी जाधव यांनी फाउंडेशन मध्ये कार्यरत असलेल्या तेजस मेलगे यांच्यासह निराधार महिला शांता कोलकार हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, शंकर कांबळे यांनी सहकार्य केले.