कु. प्रिया जोमणे, कु. किर्ती चौगुले व कु. विनित मोटरे यांची राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

Ravindra Jadhav
कु. प्रिया जोमणे, कु. किर्ती चौगुले व कु. विनित मोटरे यांची राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगाव जिल्हा राणी चन्नम्मा सेल्फ डिफेन्स व कराटे स्पोर्टस असोशिएशनच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयीन सिलंबम स्पर्धेत सुयश संपादन केले.

कोलार येथे ही राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेत कु. प्रिया जोमणे, कु. किर्ती चौगुले व कु. विनित मोटरे यांनी खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेल्या सिलंबमपटूंची निवड राष्ट्रस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
सुयश मिळविलेल्या या सिलंबमपटूंना कराटे प्रशिक्षक आणि सिलंबम मास्टर श्री. लक्ष्मण नायक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article