श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी

Ravindra Jadhav
श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा साजरी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैशवाणी समाजातर्फे बुधवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री समा देवीची पूजा व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण झी मराठी प्रस्तुत हास्य सम्राट या कार्यक्रमाचे विजेते प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा ‘ हास्य संध्या ‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीपक देशपांडे यांनी आपल्या खुमासदार विनोदी शैलीत उपस्थितांचे मनोरंजन केले व खळखळून हसविले. त्यानंतर कोजागिरीच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतुरकर, युवा संघटना अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव रवी कलघटगी, महिला मंडळ अध्यक्ष सौ. अंजली किनारी, सेक्रेटरी वैशाली पालकर, विश्वस्त मोहन नाकाडी व मोतीचंद दोरकाडी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्या कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध उद्योजिका पल्लवी कोरगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवा-युवतींचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या दांडिया गरबा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद निखार्गे यांनी तर आभार प्रदर्शन अमित कुडतुरकर यांनी केले. त्यानंतर सर्व उपस्थित समाज बांधवांना दुधाचे वाटप करण्यात आले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकांत घेवारी, गोकुळ मुरकुंबी, सुदेश पाटणकर, सुयश पानारी, राहुल गावडे, परेश नार्वेकर, राकेश कलगटगी विक्रांत कुदळे अमित गावडे आनंद गावडे रुपेश बापशेट, राकेश बापशेट, राकेश आसुकर, प्रसाद निखार्गे, साईप्रसाद कुडतुरकर, सचिन कुडतुरकर, संदीप कडोलकर, संतोष नार्वेकर, कमलेश बेट्गेरी तसेच महिला मंडळातील सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article