सोलापूरच्या कीर्तीने रचला नवा इतिहास : अवघ्या 10 तास 25 मिनिटात केले 32 किलोमीटर समुद्री अंतर पार

Ravindra Jadhav
सोलापूरच्या कीर्तीने रचला नवा इतिहास : अवघ्या 10 तास 25 मिनिटात केले 32 किलोमीटर समुद्री अंतर पार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : सोलापूर येथील जलतरणपटू कीर्ती हिने 32 किलोमीटर समुद्री अंतर अवघ्या 10 तास 25 मिनिटात पोहून पार करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

किर्ती नंदकिशोर भराडिया या सोलापूरकर जलतरणपटूने श्रीलंका ते भारत दरम्यानचे 32 कि.मी.चे समुद्री अंतर 10 तास 25 मिनिटात पोहून पूर्ण करत एक नवा इतिहास रचत सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

तिने हा नवा विक्रम नोंदवत ” लाँगेस्ट नॉन-स्टॉप ट्रान्सनॅशनल स्विम बाय अ चाइल्ड ” हा बहुमान मिळविला असून तिच्या या नव्या विक्रमाबद्दल तिचे आणि तिच्या प्रशिक्षक व पालकांचे कौतुक होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article