खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने उद्या शनिवारी मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचार शिबीर

Ravindra Jadhav
खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने उद्या शनिवारी मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचार शिबीर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्यावतीने आणि सरकारी इस्पितळ खानापूर आणि जिल्हा इस्पितळ बेळगाव यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता स्थळ श्री माऊली मंदिर कणकुंबी येथे मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन आणि औषधोपचार शिबीर आयोजिण्यात आले आहे.

कणकुंबी आरोग्य केंद्र, ग्राम पंचायत कणकुंबी,पारवाड, आमटे व गोल्याळी तसेच कणकुंबी पंचक्रोशीतील संघ संस्था पंचमंडळ ग्रामस्थ व देणगीदार श्री माऊली मंदिर कणकुंबी व्यवस्थापक मंडळ यांच्या सहकाऱ्यातून हा उपक्रम राबविला जात आहे.
या शिबिरामध्ये डोळे तपासणी, मोफत चष्मे वितरण, दंत चिकित्सा, रक्तदाब, रक्तशर्करा (बीपी, शुगर ) तपासणी,
स्त्रियांचे आजार व इतर सर्व आजारावर तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचार केले जाणार आहे.

तरी खानापूर तालुक्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती शिबीर आयोजकांकडून करण्यात आली आहे.
शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी येताना शिबीर नोंदणीसाठी आपल्याबरोबर आधार कार्ड व रेशन कार्ड , फोन नंबर आणायचे आहे. प्रवेश नोंदणी शिबिराच्या ठिकाणी घेतली जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article