बेळगाव, दिनांक 13 ( प्रतिनिधी) : बेळगावच्या केतकी पाटील या शरीरसौष्ठवपटूंने 56 व्या आशियाई शरीरसौष्ठव आणि फिजिक चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावत बेळगावनगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
इंडोनेशियातील बाटम येथे नुकतीच ही स्पर्धा झाली. यावेळी आशियाई स्पर्धेतील स्पोर्ट्स मॉडेल फिजिक श्रेणी (165 से.मी.) आणि लेडीज स्पोर्ट्स मॉडेल फिजिक श्रेणी (35 वर्षांपेक्षा जास्त वयोगट) या दोन्हीमध्ये केतकी पाटील यांनी 5 वे स्थान मिळवले
केतकी या स्पोर्ट्स मॉडेल फिजिक फिटनेसमध्ये चार वेळा राष्ट्रीय विजेत्या आहेत.
या यशाबद्दल केतकी पाटील हिचे शरीरसौष्ठव क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.