कबड्डी स्पर्धेत कसबा नंदगड ग्रामपंचायत संघाची तोपिनकट्टी ग्रामपंचायत संघावर मात

Ravindra Jadhav
कबड्डी स्पर्धेत कसबा नंदगड ग्रामपंचायत संघाची तोपिनकट्टी ग्रामपंचायत संघावर मात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7 news) : खानापूर तालुका क्रीडा महोत्सवांतर्गत झालेल्या कबड्डी स्पर्धेत कसबा नंदगड ग्रामपंचायत संघाने विजेतेपद पटकाविले.

बेळगाव जिल्हा पंचायत यांच्या अखत्यरित्या व युवा सबलीकरण आणि क्रीडा विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजिण्यात आली होती.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कसबा नंदगड ग्रामपंचायत संघाने तोपिनकट्टी ग्रामपंचायत संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकाविला.

या कबड्डी संघामध्ये श्रीहरी, प्रमोद, महेश, ओंमकार
गणेश, धीरज, अमोघ, शिवम, सरण, कार्तिक या खेळाडूंचा समावेश असून या खेळाडूंना चन्नेवाडी व आनंदगड हायस्कूलचे क्रीडा शिक्षक फोंडुराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये कसबा नंदगड, चन्नेवाडी, भुत्तेवाडी, झुंजवाड, खैरवाड, गरबेनहट्टी या गावांचा समावेश आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article