दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धा : रिंक रेस मध्ये कर्नाटकाची मुसंडी

Ravindra Jadhav
दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धा : रिंक रेस मध्ये कर्नाटकाची मुसंडी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7news) : दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कर्नाटकाने मुसंडी मारली आहे.

येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल शाळेच्यावतीने आयोजित या स्पर्धेची रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे घेण्यात आली. यामध्ये कर्नाटकसह केरळ, महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण आधी ठिकाणचे आघाडीचे स्केटिंग पटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत 9 वर्षाखालील मुलांच्या विभागात -आर्यन तेजस्वी 1 सुवर्ण पदक, आदित्ययान एस. ए. 1 रौप्य, पूर्विक गौडा टी. एस. 1 कांस्य पदक. 9 वर्षाखालील मुलींच्या विभागात -ऐशानी संतोष 1 सुवर्ण, इक्रा शहाजहान 1 रौप्य, जयनाश्री एस. 1 कांस्य. 11 वर्षाखालील मुलांच्या गटात
-मानस डी. 1 सुवर्ण, एकाष्य डी. अडिगा 1 रौप्य, आयुष मेश्राम 1 कांस्य पदक. तर याच वयोगटात मुलीच्या विभागात -वैष्णवी एच एम 1 सुवर्ण, निशिथा शावकुर 1 रौप्य, एन. रित्विका मल्ल्या 1 कांस्य.
14 वर्षाखालील मुलांच्या गटात -श्र्वालम क्रिस्टीन 1 सुवर्ण पदक, कर्निका पंचाक्षरी 2 रौप्य, संचित गावडे 1 कांस्य तर मुलींच्या गटात -मनस्वी पिसे 1 सुवर्ण, आनघा जोशी 1 रौप्य, लारिशा काशीकर 1 कांस्य पदक, 17 वर्षाखालील मुलांच्या गटात -अक्षय के. 1 सुवर्ण, सौरभ साळोखे 1 रौप्य, चिन्मय मारके 1 कांस्य पदक. तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात-स्नेहा गौडा 1 सुवर्ण पदक, पी. दक्षता उथप्पा 1 रौप्य, आरोही वाडीतवार 1 कांस्यपदक मिळविले.
19 वर्षाखालील मुलांच्या विभागात -गर्व सुतार 1 सुवर्ण, टी. एस. गणेसन 1 रौप्य, हार्दिक 1 कांस्य पदक. तर याच वयोगटात मुलींच्या विभागात -अंजुश्री ए. 1 सुवर्ण, रीना रॉय 1 रौप्य, तुलसी 1 कांस्य पदक मिळविले.

दक्षिण विभागीय निरीक्षक प्रशिक्षक रविश राव, मुख्य रेफरी स्मिर्ती यांच्यासह 18 जणांची ऑफिशियल टीम शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचीती आंबेकर, ज्योती चिंडक, सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळुरकर, इम्रान बेपारी, रमेश चिंडक, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, शेफाली शंकरगौडा , सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, स्वरूप पाटील, प्रदीपकुमार पूनिया तसेच गुड शेफर्ड सेंट्रल शाळेचा स्टाफ व कर्मचारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article