Ad imageAd image

कणेरी मठ स्वामीजींची कपिलेश्वर मंदिरास भेट : केले समाधान व्यक्त

Ravindra Jadhav
कणेरी मठ स्वामीजींची कपिलेश्वर मंदिरास भेट : केले समाधान व्यक्त
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : येथील संभाजी उद्यानात आयोजित जाहीर निषेध सभेसाठी बेळगावला आलेल्या कणेरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सभास्थळी जाण्याआधी आपल्या अनेक मठांच्या मान्यवर स्वामींच्या समवेत कपिलेश्वर देवस्थानास सदिच्छा भेट दिली. मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष दौलत साळुंखे यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
कपिलेश्वर परिसराची स्वामीजींनी पाहणी केली आणि बेळगावात या तीर्थक्षेत्राचे चाललेले काम पाहून समाधान व्यक्त केले.

कणेरी मठाची प्रेरणा घेऊन आम्ही कपिलनाथ मंदिर विश्वस्त मंडळाने येथे कार्य चालू ठेवले आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्ट कार्यकर्त्यांनी स्वामीजींना याप्रसंगी बोलताना दिली. यावेळी कपिलेश्वर ट्रस्टचे अजित जाधव, राजू भातखंडे, अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, रमेश देसुरकर, विकास शिंदे ,संतोष गुंजीकर यांच्यासह सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.

यावेळी स्वामीजीं समवेत 40 विवीध मठाचे स्वामीजी उपस्थित होते. त्या सर्वांना कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सन्मानित करण्यात आले. सर्व स्वामीजींचे आगमन होताच ‘जय श्रीराम ,जय जय श्रीराम “अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. ” वक्फ बोर्ड हटाव, देश बचावो ” अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट च्या सदस्यांचे कार्य पाहून श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article