तोप्पीनकट्टीचे कल्लाप्पा तिरवीर रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर

Ravindra Jadhav
तोप्पीनकट्टीचे कल्लाप्पा तिरवीर रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 20 ( प्रतिनिधी) : आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित बेळगाव रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये खानापूर तालुक्यातील तोप्पीनकट्टी येथील कल्लाप्पा तिरवीर यांनी 46 ते 99 वयोगटात दुसरा क्रमांक पटकाविला.

ही स्पर्धा बेळगाव जिल्हा क्रीडांगणावार झाली. यामध्ये दहा किलोमीटर, पाच किलो मीटर व तीन किलोमीटर अशा तीन गटांमध्ये 15 ते 30, 31 ते 45 व 46 ते 99 वयोगट अशा तीन गटांमध्ये झाली.
या स्पर्धेमध्ये बेंगलोर, म्हैसूर, मंगळूर, गोवा, महाराष्ट्र, आर्मी सैनिक स्कूल सह विविध जिल्ह्यांतील व विविध राज्यातील जवळपास एक हजारहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये कल्लाप्पा तिरवीर यांनी 46 ते 99 वयोगटात दुसरा क्रमांक पटकाविला.

कल्लाप्पा तिरवीर हे वयाच्या दहाव्या वर्षापासून आजपर्यंत सातत्याने धावण्याचा सराव करत असून त्यांनी देश-विदेशात झालेल्या स्पर्धामध्ये अनेक पदके मिळविली आहेत. सध्या कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले कल्लाप्पा तिरवीर हे आजही नियमितपणे ते 20 किलोमीटर धावण्याचा सराव करतात. त्यांना गर्लगुंजीचे ज्येष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोलेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
बेळगाव रन हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article