जिजामाता महिला सहकारी बँक निवडणूक बिनविरोध : चार नव्या चेहऱ्यांचा समावेश

Ravindra Jadhav
जिजामाता महिला सहकारी बँक निवडणूक बिनविरोध : चार नव्या चेहऱ्यांचा समावेश
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : येथील जिजामाता महिला सहकारी बँकेची निवडणूक निवडणूक बिनविरोध झाली. संचालक मंडळात जुन्या संचालकासह नव्याने चार संचालकांचा समावेश करण्यात आला.

2025-2030 या कालावधीसाठी लागलेल्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारी दिवशी बँकेच्या हितासाठी काहींनी अर्ज मागे घेतल्याने संचालकांची निवड बिनविरोध झाली.

संचालक मंडळात वकील मीनल जयराज मोदगेकर, संगीता संजय काविलकर, स्वाती गणेश चौगुले, उमा शामराव कांबळे या नव्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे.तर मागील संचालक मंडळातील भाविकाराणी जीवनराज होनगेकर, साक्षी स्वप्निल चोळेकर, शशिकला गणपतराव काकतकर, लता नारायण खांडेकर, मंगल पांडुरंग नाईक, लिला गोविंद पाटील, भारती संजीव किल्लेकर यांची संचालक म्हणून पुन्हा निवड झाली आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे गोविंदगौडा पाटील, बँकेचे व्यवस्थापक वकील नितीन आनंदाचे यांनी काम पाहिले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article