Ad imageAd image

जनहो, सावधान : नुकताच गेलाय दोघांचा बळी, प्राणहानी टाळण्यासाठी घ्या थोडी खबरदारी

Ravindra Jadhav
जनहो, सावधान : नुकताच गेलाय दोघांचा बळी, प्राणहानी टाळण्यासाठी घ्या थोडी खबरदारी
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : गुरुवारी रात्री वीज कोसळून शिवारात काम करणाऱ्या दोघां शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर 12 मेंढ्या गतप्राण झाल्या.
हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात वीज पडून एका 35 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.
रायबाग येथेही एका 45 वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याचे तर चोघे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
याशिवाय संकेश्वर शहराच्या हद्दीत वीज पडून 12 मेंढ्यांचा मृत्यू झाला.

या आधीही बेळगाव जिल्ह्यात वीज कोसळून जीवितहानी झाल्याच्या तर काहीजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळेच वीज कोसळून होणारी प्राणहानी टाळण्यासाठी थोडी सावधानता बाळगावी, थोडी काळजी घ्यावी.

पावसाळ्याआधी म्हणजेच अवकाळी ( वळीव) बरसण्यापूर्वी एप्रिल ते जूनच्या काळात वीज पडण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच दुपारनंतर वीज कोसळण्याचे प्रमाण जास्त असते.
आकाशात विजा चमकत असताना योग्य ती खबरदारी बाळगल्यास आपण प्राणहानी टाळू शकतो.

विजा चमकत असताना सोबत कुठलीही धातूची वस्तू नसावी. शेतात काम करीत असताना वीज चमकू लागल्यास शेतकऱ्याने त्वरित शेताजवळील घराचा आसरा घ्यावा. तसेच पायाखाली कोरडे लाकूड, गोणपाट, कोरडा पालापाचोळा अथवा एखादे प्लास्टिक घ्यावे. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसावे. पायाव्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी.

जलतरण तलाव अथवा विहिरीत पोहणाऱ्यांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावे. आणि कोरड्या ठिकाणी आडोशाला थांबावे. दलदलीचे ठिकाण तसेच पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहावे.
वीजेपासून वाचण्यासाठी कदापि झाडाखाली थांबू नये. झाडापासून झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे. वनात कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा.
दोन चाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर चालवत असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जावे. चारचाकी वाहनातून प्रवास करीत असल्यास वाहनातच रहावे.
वीज सर्वात जास्त खुल्या मैदानात पडतात. यासाठी वीज चमकत असल्यास खुल्या मैदानात उभे राहू नये. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नये. धातू विजेला आकर्षित करीत असल्याने गाव, शेत, आवार, बाग आणि घराभोवती तारेचे कुंपण घालू नये. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नये. अशावेळी मोबाईलचा वापर शक्यतो टाळावाच.
वीज सरळ अंगावर पडू शकते अथवा ती बाजूच्या वस्तूवर पडल्यानंतर तिचा झोत अंगावर येवू शकतो किंवा ती लांब कुठे तरी पडल्यानंतर जमिनीखाली असलेल्या तारा, पाईपद्वारे तिचा धक्का बसू शकतो. ज्या व्यक्तीवर वीज कोसळते त्या व्यक्तीस त्वरित प्रथमोपचार दिल्यास त्याचे प्राण वाचू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article