समाजोन्नतीसाठी समाजातील मुलां-मुलींनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक : गुरुसिद्ध स्वामीजी

Ravindra Jadhav
समाजोन्नतीसाठी समाजातील मुलां-मुलींनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक : गुरुसिद्ध स्वामीजी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 13 ( प्रतिनिधी) : समाजोन्नतीसाठी समाजातील मुलां-मुलींनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत कारंजी मठाचे स्वामीजी श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी व्यक्त केले.

गनिगा समाज अभिवृद्धी संघ, बेळगाव यांच्यावतीने समाजातील दहावी-बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या बेळगाव जिल्ह्यातील एकूण 72 विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष प्रकाश बाळेकुंद्री होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विजयालक्ष्मी ईश्वरप्पा बाळेकुंद्री उपस्थित होत्या. कारंजी मठाचे स्वामीजी श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

श्रीमती श्रुती बागेवाडी यांच्या भरतनाट्यम नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गनिगा महिला मंडळाच्या सदस्यांनी गनिगा स्वागतगीत गायले. श्रीमती विजयालक्ष्मी होसमणी यांनी आवाहन गीत गायले. यानंतर गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जी. बी. गिरिजनवर, प्रवीण एस. गाणिगेर, वाय. बी. कटकोळ, एल. आय. लक्कमनवर, महंतेश वी. चोळाचगुड व इरन्ना देयन्नावर या समाजातील विविध महत्त्वाच्या पदावर असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

प्रताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्लप्पा सिद्धण्णावर, महादेव सिद्धन्नावर, मल्लाप्पा हलगी, लिंगराज बागेवाडी, संजय के. बाळेकुंद्री, आनंद बागेवाडी, विद्याधर तेरणी, सतीश बाळेकुंद्री, सुजय बाळेकुंद्री, संजू टी. बाळेकुंद्री, संजय तेली, नागराज बाळेकुंद्री, रवींद्र काकती, श्रीमती मंगला सिद्धण्णावर, वसंत मुतगेकर, रमेश सिद्धण्णावर, सदानंद हलगी यासह अन्य समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article