Ad imageAd image

आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू मसूद बरोडवाला यांनी घेतली बेळगाव भेट : केले 1984 च्या कराटे पटूंना मार्गदर्शन

Ravindra Jadhav
आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू मसूद बरोडवाला यांनी घेतली बेळगाव भेट : केले 1984 च्या कराटे पटूंना मार्गदर्शन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : 1981 चे आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन ( वर्ल्ड कराटे चॅम्पियन ) आणि महाराष्ट्र कमांडो पोलिसांचे माजी कराटे प्रशिक्षक मसूद बरोडवाला यांनी नुकतीच बेळगावला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बेळगाव मधील 1984 च्या कराटे खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच कराटेचे प्रात्यक्षिक दाखविले.
हॉटेल सूर्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.

75 वर्षीय आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन मसूद बरोडवाला यांचा या वयातील खेळाबद्दलचा उत्साह वाखावण्यासारखा होता. खेळाविषयी आत्मीयता असेल की, आरोग्यही समृद्ध होते, असे बरोडवाला म्हणाले. यावेळी त्यांनी 1984 मध्ये बेळगावला येऊन कराटेचे प्रशिक्षण घेतल्याच्या गोड आठवणी उपस्थितांसमोर सांगितल्या.
याप्रसंगी बेळगावचे आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू अमर बांदिवडेकर आणि मसूद बडोदावाला यांचा कराटेप्रेमींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी रमेश कडुकर, परशुराम दुर्गाडी, शिवप्रसाद भगवंतनवर, श्रीधर मेंडोली, रमेश शेरीगार, मंजुनाथ मोरकर, कॅनन, निकॉन, इपसॉन होंगल आदी उपस्थित होते.
मोहन कलघटकर, मंजुनाथ कलघटकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष होंगल यांनी केले. विजय बांदिवडेकर यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article