वैश्यवाणी युवा संघटनेतर्फे आंतर शालेय देशभक्तीपर गीत गायनाच्या स्पर्धा संपन्न

Ravindra Jadhav
वैश्यवाणी युवा संघटनेतर्फे आंतर शालेय देशभक्तीपर गीत गायनाच्या स्पर्धा संपन्न
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 17 ( प्रतिनिधी) :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वैश्यवाणी युवा संघटना, श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये बेळगाव शहरातील 15 शाळांनी सहभाग घेतला होता. यात तीसहून अधिक देशभक्तीपर गीते सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल मोहन कट्टी व उद्योगपती विठ्ठल गवस उपस्थित होते. व्यासपीठावर युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव रवी कलघटगी, उपसचिव प्रसाद निखागेंं, खजिनदार रुपेश बापशेठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष विक्रांत कुदळे, समादेवी संस्थानचे अध्यक्ष दत्ता कणबगींं, सचिव अमित कडतुरकर, महिला मंडळ अध्यक्ष अंजली किनारी, सचिव वैशाली पालकर उपस्थित होत्या.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजश्री हेब्बाळकर आणि विशाखा देशपांडे यांनी काम पाहिले.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम तसेच पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

सोलो मध्ये प्रथम क्रमांक डी.पी.हायस्कूल, द्वितीय क्रमांक जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक ज्ञान प्रबोधन मंदिर या शाळांनी क्रमांक पटकाविला. स्कूल
ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक सेंट पॉल्स हायस्कूल, तृतीय क्रमांक ज्योती सेंट्रल स्कूल या शाळानी क्रमांक संपादन केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिचा जुवळी, दर्शिता कुडतुरकर, गौतमी पठाणी यांनी केले. विक्रांत कुदळे यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article