इंडियन कराटे क्लब बेळगाव जिल्हा क्रिडा संघटनेच्या तीन विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट प्रदान

Ravindra Jadhav
इंडियन कराटे क्लब बेळगाव जिल्हा क्रिडा संघटनेच्या तीन विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट प्रदान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रिडा संघटनेच्या तीन विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले.

मुचंडी (बेळगाव) येथील औदुंबर मंगल कार्यालय येथे कराटेची बेल्ट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 75 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते. यावेळी उल्लेखनीय खेळाचे सादरीकरण केलेल्या आणि खेळात प्राविण्य मिळविलेल्या साहिल काकती, सिध्दार्थ मोदगे आणि रोहिणी ताशिलदार या इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रिडा संघटनेच्या तिघां कराटे पटूंना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले.
या तिन्ही विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होऊन विविध ठिकाणी पदके मिळविली आहेत.
इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते या तिघांना ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पाहुणे म्हणून पीडब्ल्यूडी विभागाचे अधीक्षक अभियंता संजु कुमार हुलकाय, लेफ्टनंट कर्नल तलुनवीरसिंग ढिल्लोन, उद्योजक अमित कोनो, उद्योजक शशांक मिराशी, मराठा मंडळ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती सुर्यवंशी, ग्रामपंचायत चेअरमन लक्ष्मण बुद्री, कंत्राटदार चनगौडा बरगावी उपस्थित होते.
बेल्ट प्रदान कार्यक्रमात ब्लॅक बेल्ट मिळविलेल्या कराटे पटूंच्या पालकांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील दोन्ही ब्लॅकबेल्ट विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक परशुराम काकती यांचे मार्गदर्शन आणि ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक मास्टर गजेंद्र काकतीकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबच्या लेडी चीफ इंस्ट्रक्टर हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर,विजय सुतार, निलेश गुरखा, हरीष सोनार,विनायक दंडकर, ,परशराम नेकनार, लक्ष्मीकांत आनंदाचे,कृष्णा जाधव , वचना देसाई, रितु चौगुले, संजु गस्ती, आदित्य तळवार, लक्ष्मण कुंभार, पार्थ चौगुले पाटील, किरण गडकर, सुमित काकती, जयकुमार मिश्रा आणि सक्षम हंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन पिंटू पाखरे यांनी केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article