भारतीय हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक : बेळगाव नगरीत जल्लोष : हॉकी बेळगावने साजरा केला विजयोत्सव

Ravindra Jadhav
भारतीय हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक : बेळगाव नगरीत जल्लोष : हॉकी बेळगावने साजरा केला विजयोत्सव
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 13 ( प्रतिनिधी ) : भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक – 24 मध्ये कांस्य पदक पटकाविल्याने हॉकी बेळगावच्या सदस्यांनी बेळगावनगरीत विजयोत्सव साजरा केला.
हॉकी बेळगावच्या सदस्य आणि हॉकी प्रेमींनी धर्मवीर संभाजी चौक येथे जल्लोष करून 100 किलो मिठाईचे वाटप केले.

यावेळी बेळगावचे ऑलिम्पिक हॉकीपटू बंडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांनी भारत माता जय अशा घोषणा दिल्या.

बेळगाव जिल्हा हॉकीचे सचिव सुधाकर चाळके, राज्य प्रशिक्षक उत्तम शिंदे यांची यावेळी भाषणे झाली. यावेळी जिल्हा पदाधिकारी सौ.पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, नामदेव सावंत, अश्विनी बस्तवाडकर, विकास कलघटगी, संजय शिंदे, दयानंद कारेकर, संतोष दरेकर, श्रीकांत आजगावकर, संभाजी पवळे, गणपत गावडे, प्रशांत मांकले, दत्तात्रय जाधव, खानापूर हॉकी संघाच्या हॉकी पटू उपस्थित होत्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article