आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचे उदघाटन

Ravindra Jadhav
आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचे उदघाटन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 24 ( प्रतिनिधी) : मराठा युवक संघ आयोजित 19 व्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ आबा क्लब व हिंद सोशल क्लब यांच्या सहकार्याने करण्यात आला.
हिंद सोशल क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर व बांधकाम व्यावसायिक अनुप जवळकर यांनी दीप प्रज्वलीत केल्यानंतर अन्य मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले. यानंतर चंद्रकांत गुंडकल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक भाषण केले. मराठा युवक संघ आयोजित आंतरराज्य आंतरशालेय स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील जवळपास 400 स्पर्धक भाग घेत असल्याचे काकतकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी आबा क्लबचे विश्वास पवार, मराठा युवक संघाचे सदस्य शेखर हंडे, महेश चौगुले, विनोद हंगिरगेकर, मारुती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, दिनकर घोरपडे, विकास कलघटगी, प्रकाश कालकुंद्रीकर, सुहास किल्लेकर, गणेश दड्डीकर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास किल्लेकर यांनी केले तर चंद्रकांत गुंडकल यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article