‘ आशाकिरण ‘ गतिमंद मुलांच्या निवासी शाळेचे उदघाटन

Ravindra Jadhav
‘ आशाकिरण ‘ गतिमंद मुलांच्या निवासी शाळेचे उदघाटन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : समाजात विविध संस्थाआणि सामाजिक कार्यकर्ते आपापल्यापरिने सामाजिक ऋण फेडण्यासाठी सेवाकार्य करीत आहेत. अशा संस्थांमुळेच समाजात चांगुलपणा टिकून असून समाजाचे हित साधले जात आहे. अशा संस्था समाजासाठी एक आदर्श निर्माण करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे, असे विचार सतीश शुगर्स फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

ऑटोनगर-बेळगाव येथे ‘ गतिमंद मुलां-मुलींसाठी आशाकिरण ‘ नावाने निवासी शाळा सुरू करण्यात आला आहे. या निवासी शाळेच्या उदघाटन समारंभात बोलताना प्रियांका जारकीहोळी यांनी उपरोक्त विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रियांका जारकीहोळी यासह बेळगाव उत्तर मतदार संघाची आमदार राजू सेठ, जयभारत फाउंडेशनचे दयानंद कदम, सामाजिक कार्यकर्ते टी. के. पाटील, आशा ज्योती अनुसूचित जाती-जमाती महिला विकास केंद्राच्या अध्यक्षा जयश्री माळगी याप्रसंगी उपस्थित होत्या.

प्रारंभी आशाकिरण गतिमंद मुलांच्या निवासी शाळेच्या संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यानंतर प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते फित कापून निवासी शाळेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी प्रियांका जारकीहोळी यांनी, ‘आशा किरण ‘ शाळा ही गतिमंद मुलांसाठी आशेचा किरण ठरेल असे यावेळी बोलताना म्हटले. यावेळी अन्य पाहुण्यांचीही भाषणे झाली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article