राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने पटकाविले चारही गटाचे विजेतेपद तर क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत तिहेरी मुकुट : 17 वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद आंध्र प्रदेशकडे

Ravindra Jadhav
राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने पटकाविले चारही गटाचे विजेतेपद तर क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत तिहेरी मुकुट : 17 वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद आंध्र प्रदेशकडे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7news) : विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत आणि विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने चारही गटाचे विजेतेपद तर क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत तिहेरी मुकुट पटकाविले. 17 वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद आंध्र प्रदेशने पटकाविले .अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा झाली.

राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगांव संघाने गुलबर्गा संघाचा 8-0 असा पराभव केला तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगांव संघाने गुलबर्गा संघाचा 4-0 असा पराभव केला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने बळ्ळारी जिल्हा संघाचा 9- 5 असा पराभव केला. तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा बेळगावने गुलबर्गा संघाचा 11-0 असा एकतर्फी पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

क्षेत्रीय हँडबॉल स्पर्धेत प्राथमिक मुलाच्या अंतिम लढतीत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना संत मीरा संघाने आंध्रप्रदेशचा 11-3 असा तर माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत आंध्र प्रदेशने संत मीरा कर्नाटकचा अटीतटीच्या लढतीत 11 -10 असा पराभव केला.
आता आगामी 9 नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी वरील विजेते संघ पात्र ठरले आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या क्रीडा भारती राज्य सचिव अशोक शिंत्रे, जिल्हा युवजन सेवा क्रीडा खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी विलास घाडी, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी , उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक, पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, शिवकुमार सुतार, यश पाटील, सुजल मलतवाडी, सिद्धांत वर्मा ,अभिषेक गिरीगौडर , चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील, पंच उमेश मजुकर, जयसिंग धनाजी, बापूसाहेब देसाई, शामल दड्डीकर, धनश्री सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर यांनी केले तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article