विभागस्तरीय हँडबॉल स्पर्धेत ‘बालिका आदर्श’ मुलींच्या संघाला प्राथमिक गटाचे अजिंक्यपद : झाली राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड

Ravindra Jadhav
विभागस्तरीय हँडबॉल स्पर्धेत ‘बालिका आदर्श’ मुलींच्या संघाला प्राथमिक गटाचे अजिंक्यपद : झाली राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : विभागीय पातळीवरील हँडबॉल स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्राथमिक गटाचे अजिंक्यपद पटकाविले. सार्वजनिक शिक्षण खाते बेळगांव विभागच्यावतीने आयोजीत या स्पर्धेत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बालिका आदर्श विद्यालय संघाने प्रतिस्पर्धी संघाचा दारुण पराभव करीत विजय मिळविला.
आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही विभागीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धा धारवाड येथील मलसर्ज इंग्लिश मिडियम शाळेच्या मैदानावर पार पडली. या स्पर्धेतील मुलींच्या प्राथमिक गटात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बालिका आदर्श विद्यालयाच्या हँडबॉल संघाने प्रारंभापासूनच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात चिक्कोडी जिल्हा संघाचा 11-0 अशा फरकाने पराभव करतअंतिम फेरीत प्रवेश केला होता.
अंतिम सामन्यात बालिका आदर्श संघाने प्रतिस्पर्धी संघाला 11-01 अशा गुण फरकाने हरवून प्रथम क्रमांकासह विजेतेपद पटकावले. विभागीय स्पर्धेत शिवानी शेलार हिने सर्वाधिक 5 गोल, आदिती कोरे हिने 2 गोल, सेजल धामणेकर हीने 3 तर संमृद्धी हीने 1 गोल करून संघाला विजयी केले.
या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मंड्या येथे येत्या 22, 23 व 24 ऑक्टोंबर रोजी राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा होणार असून त्यामध्ये बेळगाव विभागाचे प्रतिनिधित्व बालिका आदर्श विद्यालयाचा संघ करणार आहे.
माध्यमिक गटात बेळगाव जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळविला.

प्राथमिक गटाच्या या मुलींच्या संघात शिवानी शेलार, समृद्धी पाटील, आदिती कोरे, सेजल धामणेकर, ऋुतुजा जाधव, श्रेया मजुकर, श्रेया खन्नुकर, श्रद्धा कणबरकर आणि अंकिता आयरेकर यांचा सहभाग आहे.
या सर्व खेळांडूना बालिका आदर्श विद्यालय शाळेचे चेअरमन जी. एन. फडके, सहसचिव आंनद गाडगीळ, मुख्याध्यापक एन. ओ . डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन, तसेच क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article