हिंदू संस्कार आणि संस्कृती टिकवायची असेल तर मुलींना आमची जिजाऊ कळली पाहिजेत : ऋतुजा जगताप

Ravindra Jadhav
हिंदू संस्कार आणि संस्कृती टिकवायची असेल तर मुलींना आमची जिजाऊ कळली पाहिजेत : ऋतुजा जगताप
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाद्वार रोड विभागाच्यावतीने बेळगाव मध्ये प्रथमच रणरागिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
दुर्गामाता दौडमध्ये असंख्य महिला व युवतीं सहभागी झाल्या होत्या. दुर्गामाता दौडीनंतर काय ? आपण धर्मकार्य कसं करावं ? यासंदर्भात कराडहून निमंत्रित करण्यात आलेल्या ऋतुजा जगताप यांनी रणरागिणी मेळाव्यात उपस्थित रणरागिनींना मार्गदर्शन केलं.

सुरुवातीला सोमनाथ मंदिर येथे पूजा करून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व राजमाता जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शुभांगी दिवटे यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन साक्षी पाटील यांनी केले.

आपले संस्कार आणि संस्कृती महान आहे आणि ती टिकवायची असेल तर मुलींना आमची जिजाऊ समजली पाहिजे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आम्हाला आमच्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. ही खेदाची बाब आहे. आपल्या हिंदू धर्मातील मुली ‘लव्ह जिहाद ‘ला बळी पडत आहेत. अनेक गायीच्या कत्तली घडत आहेत. ही वास्तविकता भयानक आहे. यासाठी युवतींचे संघटन वाढले पाहिजेत. आपली संस्कृती आणि धर्म रुजवण्याची जबाबदारी ही पालकांची आहे. मुलींना शिकवलं पाहिजे त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे, असे ऋतुजा जगताप यावेळी बोलताना म्हणाल्या.

ख्रिश्चनिकरण आणि जिहादीकरण थांबवलं ही आज काळाची गरज आहे. यासाठी हिंदू संघटित झाले पाहिजेत.
आपले संस्कार रुजविण्यासाठी आपण नित्य उपक्रम सुरू ठेवले पाहिजेत. त्यासाठी आधी छोट्या स्तरावरून सुरवात करणे गरजेचे आहे, असेही ऋतुजा जगताप म्हणाल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे माजी शहर प्रमुख अजित जाधव, राहुल कुरणे, अभिजीत चव्हाण, दौलत जाधव, परशराम काकतकर, मंगेश हरेर, शिवशार्दुल भातकांडे, शिवसम्राट भातकांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article