Ad imageAd image

हुबळीची सौंदर्यवती रुपताराने पटकाविला क्लासिक मिसेस इंडिया सेकंड रनर अपचा मुकूट

Ravindra Jadhav
हुबळीची सौंदर्यवती रुपताराने पटकाविला क्लासिक मिसेस इंडिया सेकंड रनर अपचा मुकूट
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बेळगाव ( bn7 news)  : वाणिज्य सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुबळीच्या रुपतारा हिने क्लासिक मिसेस इंडिया, कर्नाटक – 2024 सौंदर्य स्पर्धेत उपविजेतेपदाचा मुकुट मिळविला.

बेंगळूरच्या किंग्ज मेडोज येथे प्रतिभा सौंशीमठ यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या क्लासिक मिसेस इंडिया, कर्नाटक या आठव्या फॅशन शो सौंदर्य स्पर्धेत हुबळीची सौंदर्यवती रुपतारा सांगलीकर -सावळगीमठ यांनी रनर अप पदाचा मुकूट मिळवत कर्नाटक विभागातून तिने राष्ट्रस्तरीय सौंदर्य स्पर्धेपर्यंत मुसंडी मारली आहे.या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील बहुसंख्य सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.

या स्पर्धेत बाजी मारत वाणिज्य शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या रुपतारा सांगलीकर – सावळगीमठ हिने ‘ बेस्ट फोटोजेनिक अवॉर्ड ‘ तसेच धारवाड जिल्हा फेरीत पहिला क्रमांक पटकाविला आहे.

रुपतारा ह्या विवाहित असून त्यांना एक मुल आहे. असे असतानाही रुपतारा यांनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन उपविजेते पदाचा मुकुट मिळवत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे, हे कौतुकास्पद असल्याचे स्पर्धा आयोजक प्रतिभा सौंशीमठ यांनी रुपतारा यांच्या यशाबद्दल बोलताना म्हटले आहे.

रुपतारा सांगलीकर – सावळगीमठ यांचे आजोळ धारवाड हे असून त्या कै. हनुमंतराव कृष्णाजी सांगलीकर यांच्या नात होत. वडील शिवाजी सांगलीकर आणि आई शांता सांगलीकर ( माहेर- हुबळी) हे 65 वर्षांपूर्वी मुंबईला स्थायीक झाले. आज आई हह्यात नाही.
रुपतारा बालपणापासूनच हुशारवृत्तीची. त्यांनी एमएबीएड आणि हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये एमबीए पर्यंतचे शिक्षण घेतले असून त्या एक उत्कृष्ट आर्टीस्ट आणि मॉडेल आहेत. त्यांना पती रवी सावळगीमठ यांचे प्रोत्साहन लाभत आहे. 
त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article