Ad imageAd image

HERF टीमच्या सेवाकार्याचा सन्मान

Ravindra Jadhav
HERF टीमच्या सेवाकार्याचा सन्मान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : एचईआरएफ बचाव पथक तुकडीचे प्रमुख बसवराज हिरेमठ, पद्मा प्रसाद हुली आणि संपूर्ण टीमचा रामकृष्णन आश्रमचे स्वामीजी आणि नगरसेवक शंकर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास केळकर बाग येथील एका विहिरीत सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगत हता. या लहान आकाराच्या 20 ते 30 फूट खोल विहिरीतील पाच ते सहा दिवसांचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढणे कठीण होते. मात्र, एचईआरएफ बचाव पथक टीम घटनास्थळी आली आणि टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ , पद्माप्रसाद हुली आणि सहकाऱ्यांनी अवघ्या एक तासात त्या विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला.
यावेळी बचाव पथकाला समाज सेवक अवधूत तुडेअकर , सौरभ सावंत, नगरसेवक शंकर पाटील, अग्निशमन दलाचे जवान व नागरिकांचे सहकार्य लाभले.
HERF टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ यांनी स्वतः विहिरीत उतरून मृतदेह बांधून तो विहीरीबाहेर काढला.

याआधीही HERF टीमने कठीण प्रसंगी धावून जाऊन अशी कामे केली आहेत.
HERF टीमच्या या कार्याची दखल घेत रामकृष्णन आश्रमचे स्वामीजी आणि नगरसेवक शंकर पाटील यांनी एचईआरएफ बचाव पथक तुकडीचे प्रमुख बसवराज हिरेमठ, पद्मा प्रसाद हुली आणि संपूर्ण टीमचा सन्मान केला. तसेच सेवाकार्याचे कौतुक केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article