अवमान रोखण्यासाठी प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालावी : हिंदू जनजागृती समिती बेळगाव शाखेची मागणी

Ravindra Jadhav
अवमान रोखण्यासाठी प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालावी : हिंदू जनजागृती समिती बेळगाव शाखेची मागणी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 13 ( प्रतिनिधी) : ‘ राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा ’ या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती बेळगाव शाखेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात. मात्र प्लास्टिकच्या स्वरूपातील राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत, गटारासह अन्यत्र फाटलेल्या अवस्थेत पडलेले आढळतात.
यामुळे राष्ट्रध्वजांची विटंबना होते.
प्लास्टिक ध्वजांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा जो अपमान होतो तो रोखण्यासाठी येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा उपक्रम राबवावा आणि त्या अंतर्गत प्लास्टिक राष्ट्रध्वजांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती बेळगाव शाखेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हिंदू जनजागृती समिती बेळगावचे प्रमुख सुधीर हेरेकर व मारुती सुतार यांच्या नेतृत्वाखाली समितीच्यावतीने उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी सुधीर हेरेकर, मिलन पवार, सदानंद मासेकर आदीसह जनजागृती समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article