‘ हर घर तिरंगा ‘ स्केटिंग रॅली : बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी घेतला होता भाग

Ravindra Jadhav
‘ हर घर तिरंगा ‘ स्केटिंग रॅली : बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी घेतला होता भाग
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 14 ( प्रतिनिधी) : बेळगाव महनगरपालिकेच्यावतीने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.

किल्ला तलाव येथून रॅलीला सुरुवात करून चन्नम्मा सर्कल येथे रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी बेळगाव शहरामधील इतर शाळांमधून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनीही भाग घेतला होता.
रॅलीदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा अशा घोषणा देत हातात तिरंगा घेऊन जनजागृती केली गेली.

या रॅलीचे उ्दघाटन बेळगाव महानगर पालिकाचे आयुक्त अशोक दुडगुंडी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण , नगरसेवक गिरीश धोंगडी, नितीन जाधव, जयंत जाधव, सूर्यकांत हिंडलगेकर, उदयकुमार तलवार, लक्ष्मी निपाणीकर, रेश्मा तालीकोटी, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येळ्ळूरकर यासह बेळगाम महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article