Ad imageAd image

परवेझ टाक याला फाशी

Ravindra Jadhav
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लैला खान हत्ये प्रकरणी परवेज टाक याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इगतपुरी येथील फार्म हाऊसच्या आवारात बॉलीवूड अभिनेत्री लैला खान व तिची आई सेलीना यासह चार भावंडांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाने बॉलीवूड जगतात खळबळ माजली होती. या हत्याकांड प्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 2012 ला अटक केलेल्या परवेझ टाक याला दोषी ठरविण्यात आले होते.
सत्र न्यायालयाने या हत्याकांड प्रकरणी परवेझ याला फाशीची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

###############################

 

‘त्या’ तरुणाला अखेर अटक
बेळगाव : प्रेमासाठी तगादा लावून तरुणीला त्रास देणाऱ्या आणि प्रेमास नकार दिल्याने तरुणीच्या घरावर दगडफेक करून धमकावणाऱ्या किणये येथील ‘त्या ‘ तरुणावर अखेर पोलीस कारवाई करण्यात आली आहे.
किणये (तालुका बेळगाव) येथील पंचवीस वर्षीय तिपन्ना नामक युवक गावातील एकवीस वर्षीय तरुणीच्या मागे लागला होता. प्रेमासाठी तगादा लावणाऱ्या त्या तरुणाच्या त्रासामुळे त्या तरुणीने आपल्या आईसह काही महिने गाव सोडले होते. पुन्हा गावात आल्यानंतर त्या तरुणाने त्या तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली.
प्रेमाला नकार दिल्याने तरुणांने तिच्या घरावर दगडफेक करून तिला धमकावल्याने तरुणीने आणि तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. यामुळे तरुणीच्या आईने पोलीस आयुक्तांचा दरवाजा ठोठावला. पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याला चांगलेच सुनावल्याने अखेर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करून तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article