Ad imageAd image

गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी दाखविली चन्नेवाडी मराठी शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता

Ravindra Jadhav
गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी दाखविली चन्नेवाडी मराठी शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर : गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील बंद पडलेली मराठी शाळा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दाखविली असून त्यांनी नुकतीच चन्नेवाडी शाळेला भेट देऊन पाहणी केली.

चन्नेवाडी (ता.खानापूर ) येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू करण्या संदर्भात ग्रामस्थांनी खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांना काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेत गट शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी सीआरपी बागवान, यल्लाप्पा कोलकार, सीडब्लूएसएन कम्मार यांच्यासह चन्नेवाडी शाळेला भेट देऊन पाहणी केली व त्या संदर्भात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून दिला.
श्रीमती राजश्री कुडची यांनी शाळा सुरू करण्या संदर्भात सकारात्मकता दाखविल्याने गावकरी व पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

तालुका गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर चन्नेवाडी गावकरी व पालकांनी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय येथील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर शाळा सुरू करण्यासाठी व शिक्षक नेमणुकीचा आदेश देण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, शिक्षक फोंडुराव पाटील, किरण पाटील, पांडुरंग ऱ्हाटोळकर, कल्लाप्पा पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर पाटील, धनंजय पाटील, शंकर पाटील, ईश्वर (बबलू) पाटील, राजू पाटील, संतोष पाटील, विनोद आंबेवाडीकर, रोहन लंगरकांडे, भूपाल पाटील, महांतेश कोळूचे आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article