Ad imageAd image

काकती येथील सरकारी आदर्श मराठी शाळेला मिळाला तालुका आदर्श एसडीएमसी पुरस्कार

Ravindra Jadhav
काकती येथील सरकारी आदर्श मराठी शाळेला मिळाला तालुका आदर्श एसडीएमसी पुरस्कार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव ( bn7news) : काकती येथील सरकारी आदर्श मराठी शाळेच्या शाळा सुधारणा आणि व्यवस्थापन समितीला  ( एसडीएमसी) या वर्षीचा तालुका आदर्श एसडीएमसी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

येथील एसडीएमसी कमिटीने मराठी शाळेचा सर्वांगीण विकासासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, शाळेची रंगरंगोटी, मुलांना बसण्यासाठी बाक, संगणक कक्ष, जिजाऊ सभागृह, स्वच्छतागृह क्रीडा साहित्य, शाळा व मुलांच्या सुरक्षितेसाठी सीसी कॅमेरे, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सेमिनार, शिक्षणप्रेमी, हिंडाल्को इंडस्टिज, टायर सेल्स कंपनी अशा देणगीदारांच्या देणगीतून शाळेची उल्लेखनीय प्रगती केली गेली आहे. या कार्याची दखल म्हणून काकती सरकारी आदर्श मराठी शाळेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सार्वजनिक शिक्षण खाते व जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या विद्यमाने तसेच गट शिक्षणाधिकारी कार्यालय ग्रामीण बेळगाव यांच्यावतीने गांधीभवन येथे आयोजित आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्तीमठ शिवानंद स्वामीजी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या. तसेच बेळगाव दक्षिण जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नलतवाड, बेळगाव ग्रामीणचे गटशिक्षणाधिकारी एस. पी. दासपणावर, बी. आर. सी प्रमुख एम. एस. मेदार उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेने केलेल्या प्रगतीची नोंद काकती सरकारी आदर्श मराठी शाळा एसडीएमसीला तालुका आदर्श एसडीएमसी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष अनिल गवी, उपाध्यक्ष सोनम टुमरी, सदस्या सोनाली गवी, अर्चना टुमरी, सरिता कोचेरी, लक्ष्मी बसरीकट्टी, नम्रता परमोजी, सचिन गवी, मुख्याध्यापक किरण करंबळकर यासह शिक्षक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article