‘ त्या ‘ आरोपीला कठोर शिक्षा द्या, महिला डॉक्टरांना संरक्षण द्या : डाॅक्टर्स, पीजी डाॅक्टर्सची मागणी : कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन

Ravindra Jadhav
‘ त्या ‘ आरोपीला कठोर शिक्षा द्या, महिला डॉक्टरांना संरक्षण द्या : डाॅक्टर्स, पीजी डाॅक्टर्सची मागणी : कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 14 ( प्रतिनिधी) : कोलकत्ता येथे वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करीत बेळगावमधील वैद्यकीय महाविद्यालयांचे डाॅक्टर्स, पीजी डाॅक्टर्स आणि विद्यार्थी -विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले.
महिला डॉक्टरांना संरक्षण मिळावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

कोलकत्ता येथील प्रकरणाची जलद चौकशी करून आरोपीला कठोर शासन करावे, पीडित डॉक्टरच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देतानाच नुकसान भरपाईही द्यावी. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जावे, अशा मागण्याच्या निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर डॉक्टर्सना संरक्षण देण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांनी दिले.

या आंदोलनात जे. एन, मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स, पीजी डॉक्टर, विद्यार्थी -विद्यार्थिनी, बीम्सचे डॉक्टर्स बहुसंख्येने सहभागी झाले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article