जायंट्सच्या राज्यस्तरीय माजी अध्यक्षांचा मेळावा संपन्न

Ravindra Jadhav
जायंट्सच्या राज्यस्तरीय माजी अध्यक्षांचा मेळावा संपन्न
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या फेडरेशन 6 ( कर्नाटक राज्य ) अंतर्गत माजी अध्यक्ष फोरम मीट व अवॉर्ड बिडीग सेमिनारचे आयोजन महिला विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील होते.
व्यासपीठावर जायंट्स सोशल वेल्फेअर फौडेशनचे मध्यवर्ती समिती सदस्य दिनकर अमीन, फेडरेशन 6 चे अध्यक्ष एल.जी.दोडमनी, समन्वयक राजू माळवदे, विशेष समिती सदस्य गजानन नेर्लीकर, सेक्रेटरी यल्लाप्पा पाटील, फेडरेशन उपाध्यक्ष श्रीधरन मलिक, फेडरेशन संचालक शिवराज पाटील, फेडरेशन संचालिका आरती शहा, माजी अध्यक्ष सुनिल मुतगेकर, माजी अध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, फेडरेशन संचालक शिवकुमार हिरेमठ उपस्थित होते.

संस्थापक नाना चुडासामा यांच्या प्रतिमेला श्री. दोडमनी यांनी पुष्पहार अर्पण केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी बेळगाव, घटप्रभा, मुनवळी, सौंदत्ती, हुबळी, उडपी येथून आलेल्या माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. श्री. अमीन यांनी माजी अध्यक्षांचे कार्य व कर्तव्य यावर आपले विचार मांडले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी झटलेल्या अविनाश पाटील, शिवराज पाटील, शिवकुमार हिरेमठ, संजय पाटील, सुनिल मुतगेकर, लक्ष्मण शिंदे, विजय बनसूर, अनिल चौगुले, पद्मप्रसाद हुली, यल्लाप्पा पाटील व मुकुंद महागावकर यांचाही सन्मान श्री. अमीन यांच्या हस्ते करण्यात आला. सुत्रसंचालन मुकुंद महागावकर यांनी केले तर लक्ष्मण शिंदे यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article