गणेश फेस्टिवल कार्यक्रम 20 पासून : 22 रोजी जागर लोक संस्कृतीचा तर 23 रोजी नवरत्नांचा सत्कार

Ravindra Jadhav
गणेश फेस्टिवल कार्यक्रम 20 पासून : 22 रोजी जागर लोक संस्कृतीचा तर 23 रोजी नवरत्नांचा सत्कार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 17 ( प्रतिनिधी) : श्री गणेश फेस्टिवल बेळगाव आयोजित कार्यक्रमांना यंदा मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी श्रीमाता सोसायटी सभागृह, न्यू गुडसशेड रोड, बेळगाव येथे प्रारंभ होत आहे.

मंगळवार दिनांक 20 रोजी दुपारी 2.45 वाजता श्रीमाता सोसायटी सभागृहात गणेश फेस्टिव्हल कार्यक्रमांचे उदघाटन केले जाणार असून दुपारी 3.00 वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक बांदेकर हे करणार आहेत.

बुधवार दिनांक 21 रोजी दुपारी 3.00 वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा ( मुगाचे गोड पदार्थ व मुगाचे तिखट पदार्थ ) असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे 2000, 1500 व 1000 रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
( पदार्थ घरी बनवून कृती व साहित्य लिहून आणणे, गोड व तिखट दोन्ही स्पर्धा वेगवेगळ्या असतील )

गुरुवार दिनांक 22 रोजी सायंकाळी 4.00 वाजता शाहीर अभिजीत कालेकर लिखित, लोक संस्कृती नाट्य कला संस्था खानापूर प्रस्तुत ” जागर लोक संस्कृतीचा” हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दिनांक 23 रोजी सायंकाळी 4.00 वाजता 1) समाजसेविका : सौ. गौरी संकेत मांजरेकर 2) साहित्यरत्न : परशराम निंगाप्पा मोटराचे 3) नाट्यभूषण : गोविंद लक्ष्मण गावडे 4) संगीतरत्न : संतोष शंकर गुरव 5) उद्योग रत्न : श्रीधर देवाप्पा धामणेकर 6) क्रीडा रत्न : सौ. मयुरा मिहीर शिवळकर 7) श्रम सेवा : श्रीमती. संध्या शिवाजी पाटील 8) कृषी रत्न : चिदंबर चण्णा पट्टणशेट्टी : 9) सामाजिक संस्था : गायत्री ऍमीटीज फौंडेशन या नवरत्नांचा सत्कार करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी श्री भक्ती महिला को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. रामलिंग खिंड गल्ली, बेळगाव. फो.: 2405040, 9449075040, श्रीमाता को-ऑप. क्रेडिट्स लि., न्यू गुडस शेड रोड, बेळगाव, फोन.: 0831-2405121
समर्थ अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., गुरुकृपा कॉम्प्लेक्स, मारुती गल्ली, बेळगाव 0831-2431357, श्री राजमाता महिला मल्टीपर्ज सोसायटी लि. न्यू गुडशेड रोड, बेळगाव. फोन. 0831-2468280, ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळा. शास्त्री नगर, बेळगाव, फोन, 9964832375, 7619448164 यावर संपर्क साधावा, अशी माहिती
अध्यक्षः मनोहर शा. देसाई, सरचिटणीसः विलास अध्यापक, खजिनदार सुनील पाटील, सदस्य : चंद्रकांत पाटील, श्रीकांत काकतीकर, महेश वस्त्रद, मारुती दळवी, अभिजीत चव्हाण, श्रीनाथ पाटील, हेमंत देसाई, संजीव नेगिनहाळ, अतुल कुलकर्णी, दयानंद बडस्कर, राजेश सावंत, विशाल देशपांडे, सुरज हुलबत्ते.
महिला कार्यकारी मंडळ सौ. मनोरमा देसाई, सौ. ज्योती आगरवाल, डॉ. सौ. मीना पाटील, सौ. रूपाली जनाज, सौ. प्रतिभा नेगिनहाळ, भक्ती देसाई, सौ. अलका जाधव, सौ. सुवर्णा बिर्जे, फ़रीदा मिर्झा यांनी दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article