Ad imageAd image

खानापूर तालुक्यातील ग्रामीण शेतकरी पात्र महिलांना केले जाणार प्रत्यारोपित कोंबड्यांचे मोफत वाटप : संबंधीत खात्याकडून अर्जाचे आवाहन

Ravindra Jadhav
खानापूर तालुक्यातील ग्रामीण शेतकरी पात्र महिलांना केले जाणार प्रत्यारोपित कोंबड्यांचे मोफत वाटप : संबंधीत खात्याकडून अर्जाचे आवाहन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर : खानापूर तालुक्यातील ग्रामीण शेतकरी पात्र महिलांना पाच आठवड्यांच्या 20 प्रत्यारोपित कोंबड्यांचे मोफत वाटप करण्यांत येणार आहे.
कर्नाटक सहकार कुक्कुटपालन महामंडळ बेंगळूर यांच्यावतीने, प्रत्यारोपित कोंबड्यांचे पालन करण्यासाठी 2024-25 सालाकरिता खानापूर तालुक्यातील एकूण 59 ग्रामीण शेतकरी महिला लाभार्थींना पाच आठवड्यांच्या 20 प्रत्यारोपित कोंबड्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

खानापूर मतदार संघातील अनुसूचित जातीतील महिला लाभार्थीसाठी 03, अनुसूचित जमाती महिलासाठी 47, अल्पसंख्याक महिला लाभार्थ्यांसाठी 01 आणि सर्वसाधारण महिला लाभार्थ्यांसाठी 08, असे एकूण 59 महिलांना कोंबड्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील जाती-जमातीतील गरजू महिलांनी अर्ज करावा. 
तालुक्यातील इच्छुक शेतकरी महिला लाभार्थी कार्यालयातून अर्ज करू शकतात. यासाठी 1) छायाचित्र जोडलेले पूर्ण अर्ज 2) ओळखपत्राची छायाप्रत /आधार कार्ड झेरॉक्स ३) बी.पी.एल कार्ड अनिवार्य प्रत या आवश्यक झेरॉक्स कागदपत्रासह ज्यांना सामान्य लाभार्थी सोडून इतर आरक्षणाची मागणी आहे त्यांनी 10/01/2025 पर्यंत आपले अर्ज या कार्यालयात जात प्रमाणपत्र अनिवार्यपणे जोडून सादर करावीत. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थांशी संपर्क साधावा, असे आवाहन पशु वैद्यकीय खात्याचे सहाय्यक संचालक डॉक्टर ए. एस. कोडगी यांनी केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article