माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मैल्लया उर्फ एस.एम. कृष्णा अनंतात विलीन : उद्या राज्यभरात सरकारी सुट्टी जाहीर

Ravindra Jadhav
माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मैल्लया उर्फ एस.एम. कृष्णा अनंतात विलीन : उद्या राज्यभरात सरकारी सुट्टी जाहीर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल तसेच कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मैल्लया उर्फ एस.एम. कृष्णा यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
एस. एम. कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. बेंगळुर येथील राहत्या घरी मध्यरात्री 2.45 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
एस. एम कृष्णा यांच्या पश्चात पत्नी प्रेमा, दोन मुली शांभवी आणि मालविका असा परिवार आहे.
एस. एम. कृष्णा हे राजकारणातले दिग्गज नेते मानले जात. आपल्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल या पदांसह अनेक महत्त्वाची सार्वजनिक पदे भुषवली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना 2023 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते.

उद्या सरकारी सुट्टी …..
सोमनहल्ली मैल्लया उर्फ एस.एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल दुखवटा म्हणून उद्या राज्यभरात सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article