Ad imageAd image

गोवावेस सर्कल येथील ‘ ती ‘ चर मुजविली : वाहनचालकांतूनहोतेय समाधान व्यक्त

Ravindra Jadhav
गोवावेस सर्कल येथील ‘ ती ‘ चर मुजविली : वाहनचालकांतूनहोतेय समाधान व्यक्त
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : गोवावेस सर्कल येथे रस्त्याची बांधणी केल्यानंतर दोन रस्त्यामधील फट तशीच राहिली होती. यामुळे वाहन चालकांना रस्ता पार करताना त्रास होत होता. या प्रभागाचे नगरसेवक नितीन जाधव यांनी ही बाब लक्षात घेऊन या फटीत पेव्हर्स बसवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करून घेतला.

गोवावेस मुख्य मार्गावर खूपच वर्दळ असते. या मार्गावरील दोन रस्त्यामध्ये असलेल्या चरीमुळे गोवावेस कॉम्प्लेक्स कडून स्विमिंग पूल किंवा सोमवार पेठेकडे जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास व्हायचा. या चरीमुळे वाहनांना धक्का बसायचा तर कधी कधी दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटायचे. यामुळे अपघात होण्याचीही शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक नितीन जाधव यांनी आमदार अभय पाटील यांना यासंदर्भात कळविले. आमदारांनी त्वरित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून ती धोकादायक चर मुजवून घेण्याची सूचना केली. त्यानुसार सहाय्यक कार्यकारी अभियंता किरण मन्नीकेरी आणि अमित राऊत यांनी पाहणी करून व्यवस्थित रित्या पेव्हर्स बसवून घेऊन ही चर मुजवून रस्ता वाहतुकीला सुरळीत करून दिला.
याबद्दल स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article