समृद्धी विकलांग संस्थेतर्फे सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

Ravindra Jadhav
समृद्धी विकलांग संस्थेतर्फे सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : येथील समृद्ध विकलांग संस्थेतर्फे संस्थेतील विकलांग महिलां आणि समाजातील मागास व आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांकरिता सबलीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या विशेष कार्यशाळेअंतर्गत महिलांना स्वसंरक्षण आणि मेकअप कौशल्य याविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मेकअप वुमन आणि संस्थेच्या अजीव सदस्या श्रीमती भूविका यांनी महिलांना मेकअप कलेसंदर्भात माहिती दिली. तसेच मेकअप कौशल्य आत्मसात करून स्वयंरोजगार करावा व आर्थिक सबल व्हावे असे सांगितले.
समृद्ध विकलांग संस्थेचे मानद अध्यक्ष पद्मप्रसाद हुली यांनी, महिलांच्या आत्मसंरक्षणाबद्दल माहिती दिली.

समृद्ध विकलांग संस्था समाजातील मागासवर्गीय महिलांच्या आणि विकालांगांच्या हितोन्नती साठी कार्य करते असेही त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे अजीव सदस्य गौतम सराफ यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article