पायोनियर बँकेत आज निवडणूक :सत्ताधारी पॅनलला विजयाची खात्री

Ravindra Jadhav
पायोनियर बँकेत आज निवडणूक :सत्ताधारी पॅनलला विजयाची खात्री
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज रविवार दि. 15 डिसेंबर रोजी बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये होत आहे. या निवडणुकीत विद्यमान पॅनल प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वास पायोनियर बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी व्यक्त केला आहे.

2020 साली बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या चेअरमन पदी श्री प्रदीप अष्टेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर गेल्या पाच वर्षात सभासदांच्या हिताच्या अनेक योजना आखून बँकेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. कोणत्याही प्रकारचा जात -पात भाषा भेद न करता संचालक मंडळाने एकजुटीने कार्य करून हे यश संपादन केले आहे.

अष्टेकर पुढे म्हणाले की, ’31 मार्च 2020 रोजी बँकेत 84 कोटी 34 लाखाच्या ठेवी होत्या आणि 53 कोटी 42 लाखाची कर्जे होते. बँकेला 83 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला होता. गेल्या पाच वर्षात नियोजनबद्ध रीत्या काम करून आर्थिक स्थितीत अमुलाग्र बदल केला आहे.

31 मार्च 2024 अखेर बँकेत 156 कोटी 70 लाखाच्या ठेवी, 116 कोटी 12 लाखाची कर्जे आणि 2 कोटी 5 लाखाचा निवळ नफा झाला आहे. आज सुमारे 184 कोटींच्या ठेवी बँकेत आहेत. पाच वर्षांमध्ये ठेवीमध्ये शंभर कोटींची वाढ झाली असून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने ऑडिट वर्ग ए असून एनपीए शून्य टक्के आहे .सातत्याने 20% डिव्हिडंड देणारी आमची एकमेव बँक आहे. राष्ट्रीयकृत बँकेत मिळणाऱ्या एटीएम कार्ड ,ऑनलाइन पेमेंट, फोन पे, डीडी ट्रान्सफर यासारख्या सर्व सुविधा पायोनियर बँकेतही आहेत.
बँकेने हिंडलगा, कणबर्गी आणि वडगाव अशा तीन ठिकाणी शाखा काढले असून सध्या एकंदर 7 शाखा ग्राहकांना सेवा देत आहेत.आम्ही सर्व संचालक एक दिलाने काम करीत असताना रवी दोडणावर याने प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशा लोकांना सहकारी संस्थांमध्ये राहण्याचा अधिकार नाही. म्हणून सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी आपली बहुमोल मते आमच्या पॅनल मधील 7 उमेदवारांना आणि आमच्या दोन महिला उमेदवारांना द्यावीत आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आमच्या पॅनल मध्ये मी स्वतः प्रदीप अष्टेकर, अनंत लाड, गजानन पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील, सुहास तराळ आणि अरुणा काकतकर व सुवर्णा शहापूरकर या महिला उमेदवार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article