Ad imageAd image

अशोक जी. चिंडक यांची कर्नाटक – गोवा प्रांतीय माहेश्वरी संघटनेच्या बेळगाव – गोवा जिल्हा संभाग उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड : निवडीबद्दल बेळगाव माहेश्वरी सभेतर्फे केला गेला सत्कार

Ravindra Jadhav
अशोक जी. चिंडक यांची कर्नाटक – गोवा प्रांतीय माहेश्वरी संघटनेच्या बेळगाव – गोवा जिल्हा संभाग उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड : निवडीबद्दल बेळगाव माहेश्वरी सभेतर्फे केला गेला सत्कार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : बेळगाव माहेश्वरी समाजातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक जी. चिंडक यांची कर्नाटक – गोवा प्रांतीय माहेश्वरी संघटनेच्या बेळगाव – गोवा जिल्हा संभाग उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा बेळगाव माहेश्वरी सभेतर्फे सत्कार करण्यात आला.

कर्नाटक -गोवा प्रांतीय माहेश्वरी संघटनेची वार्षिक बैठक बळ्ळारी येथील राधाकृष्ण मंदिर भवन येथे खेळीमेळीत पार पडली. या बैठकीत बेळगाव माहेश्वरी समाजातील प्रमुख मान्यवर अशोक जी. चिंडक यांची वर्ष 2023 ते 2026 या कालावधीसाठी बेळगाव -गोवा जिल्हा संभाग (बेळगाव, गोवा, धारवाड, कारवार, गदग) उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
राज्यातील सुमारे 110 हून अधिक सदस्य या बैठकीला उपस्थित होते.

अशोक चिंडक यांच्या अभिनंदनीय निवडीबद्दल त्यांचा बेळगाव माहेश्वरी सभेतर्फे अध्यक्ष शिशिर मालू, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भट्टड व सचिव विजय राठी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बेळगाव माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भंडारी, सचिव ब्रिजमोहन लाहोटी, सदस्य अनिल बाहेती, विष्णू बजाज, गिरिधारी मर्दा आदी उपस्थित होते.

अशोक चिंडक हे शहापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळासह बेळगाव मधील विविध सामाजिक संघ-संस्थेत सेवाकार्य करतात. यामुळे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे माहेश्वरी समाजासह ईतर समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article