Ad imageAd image

आधी नियोजित वधूने केली आत्महत्या आणि मग …..त्यानेही स्वतःला गळफास लावून घेत संपविले जीवन

Ravindra Jadhav
आधी नियोजित वधूने केली आत्महत्या आणि मग …..त्यानेही स्वतःला गळफास लावून घेत संपविले जीवन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : विवाह ठरला आणि दोघांनी सुखी संसाराची स्वप्नं पाहिली. पण, नियतीने काही वेगळाच खेळ खेळला. संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या नियोजित वधुवर जणू आकाशचं कोसळले, जेव्हा तिला कळले की आपल्याला कॅन्सर झालाय.

वैद्यकीय तपासणीत तिला कॅन्सर झाल्याचे समजताच तिचे स्वप्न पत्त्याच्या बंगल्यासारखे धाडकन कोसळले आणि खिन्न होऊन तिने मृत्यूला कवटाळले.
फत्तेपुर येथे राहणाऱ्या आपल्या नियोजित वधूने आत्महत्या केल्याची बातमी कपड्यांच्या व्यापारासाठी उत्तर प्रदेशातील फतेपुर येथून बेळगावमध्ये आलेल्या नियोजित वर आवेश जुबेर पठाण ( वय 27) याला समजली आणि त्याने विरह सहन न झाल्याने बेळगाव चिरागनगर येथील राहत्या घरी स्वतःला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
खडेबाजार पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article