Ad imageAd image

डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचे ‘ सांधेदुखी पासून मुक्त होण्याचा प्रवास ‘ या विषयावर उद्या व्याख्यान

Ravindra Jadhav
डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचे ‘ सांधेदुखी पासून मुक्त होण्याचा प्रवास ‘ या विषयावर उद्या व्याख्यान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : लोकमान्य हॉस्पिटल, पुणे यांच्यातर्फे बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता ‘ आरोग्य संवाद….सांधे दुखीपासून मुक्त होण्याचा प्रवास ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात सदर व्याख्यान होणार आहे. लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक, आंतरराष्ट्रीय किर्तीचे सांधे रोपण तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या टीममधील डॉ. श्रीकृष्ण जोशी हे व्याख्यान देऊन नागरिकाशी संवाद साधणार आहेत.

आजकाल बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार यामुळे तरुण वयातच सांध्याचे विकार, पाठदुखी उद्भवत आहे. अशावेळी आपण दुर्लक्ष केल्याने वा योग्य वेळी
उपचार न केल्याने हे आजार अधिकच बळावतात.
या आजारावर आपण वेळीच उपचार केले तर
95% टक्के पाठदुखीच्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरजच लागत नाही. मग आपण पाठ दुखी टाळण्यासाठी नेमके काय केले पाहिजे?
ज्येष्ठ नागरिकाना भेडसावणारी समस्या म्हणजे सांध्याचे दुखणे त्यामध्ये सांध्याचे आजार का उदभवतात ? ते या वयात टाळता येतात का ? ते कसे टाळायचे ? नियंत्रित कसे करायचे ?, नेमके कोणते व्यायाम या वयात करायचे ? काय खायचे ? काहीना ऑपरेशन सांगितले जाते ते खरोखरीच गरजेचे असते का ? ऑपरेशन केलेच नाही तर काय होईल ?
इंजेक्शन, लेसर सारख्याचा उपयोग यामध्ये होतो का? या वयात ऑपरेशन सहन होते का?
या सारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला डॉ.श्रीकृष्ण जोशी यांच्या व्याख्यानातून मिळणार आहेत. व्याख्यानाच्या नंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article