Ad imageAd image

शनैश्वर ‌एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचालकांनी घेतली खासदार शेट्टर यांची सदिच्छा भेट : दिल्या शुभेच्छा : केले अभिनंदन

Ravindra Jadhav
शनैश्वर ‌एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी संचालकांनी घेतली खासदार शेट्टर यांची सदिच्छा भेट : दिल्या शुभेच्छा : केले अभिनंदन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

बेळगाव : श्री शनैश्वर ‌एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी, बेळगाव या संस्थेच्या संचालकांनी बेळगावचे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
भाजप युवा नेते किरण जाधव यांनी ही भेट घडवून आणली.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अनिल चौधरी व संजयभावी यांनी शाल अर्पण करून जगदीश शेट्टर यांचे स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी शिवराज पाटील यांनी मिठाई दिली तर संस्थेतर्फे खासदारांना श्री शनैश्वराची प्रतिमा आणि संस्थेच्या प्रगतीचा अह‌वाल देण्यात आली. सदर भेटीप्रसंगी रमेश जारकीहोळी हेदेखील उपस्थित होते.

यावेळी अनिल चौधरी यांनी खासदारांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच संस्थेने नुकत्याच खरेदी केलेल्या जागेवर होणाऱ्या नियोजित बांधकामाचा आराखडा आणि खर्चाचा तपशील सादर केला.
खासदार जगदीश शेट्टर यांनी यावेळी अहवाल वाचन करून संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि नव्या बांधकामासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या शिवाय ताशीलदार गल्लीतील रेल्वे पुलाबद्दलही महत्वाच्या सुचना मांडून एक योजना कथन केली.

याप्रसंगी महांतेश देसाई, गीता कट्टी, किरण जाधव, विकास कलघटगी यासह संस्थेचे संचालक उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article