धारकरी रोशनी मुळीक यांचा कपिलेश्वर मंदिरात करण्यात आला सन्मान

Ravindra Jadhav
धारकरी रोशनी मुळीक यांचा कपिलेश्वर मंदिरात करण्यात आला सन्मान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी, शिवभक्त कु. रोशनी मुळीक यांची सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) दाखल झाल्या असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरच्या वतीने व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड विभाग यांच्यावतीने गौरव करण्यात आला.

कु. रोशनी मुळीक यांना श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये पालखी सोहळा व महाआरतीकरिता विशेष निमंत्रण दिले होते.

यावेळी पालखी सोहळ्यास उपस्थित असलेल्या . रोशनी मुळीक यांनी महा आरतीनंतर शिवनामाचा जयघोष केला.
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी यावेळी मंदिर परिसर दुमदुमला होता.

मंदिर ट्रस्ट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान महाद्वार रोड विभागाच्यावतीने यावेळी रोशनी मुळीक यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी कपिलनाथ मंदिर ट्रस्टी, सेवेकरी व शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article