Ad imageAd image

श्री वैद्यनाथ देवाला दवणा चढवण्यासाठी भाविक रवाना

Ravindra Jadhav
श्री वैद्यनाथ देवाला दवणा चढवण्यासाठी भाविक रवाना
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : सालाबाद प्रमाणे नार्वेकर गल्ली, बेळगाव श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळ आज शनिवार दिनांक 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजता महिपाळगड वैद्यनाथ येथे बैलगाड्यांसोबत पायी रवाना झाले.

वैद्यनाथ डोंगरावर पोहोचल्यानंतर हे भाविक तिथे वसती राहून उद्या रविवार दि. 26 मे रोजी सकाळी पहाटे 5 वाजता वैद्यनाथ देवाला दुग्धाभिषेक करून देवाला दवणा चढविणार आहेत. यावेळी गुलाल चढवून खीर भात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप केला जाणार असून परत संध्याकाळी परतीचा प्रवास करणार आहेत.

https://www.facebook.com/share/v/6VetGUzrnVxAPRhJ/?mibextid=oFDknk

चैत्र यात्रा झाल्यावर श्री वैद्यनाथ देवाला दवणा चढवण्याची जुनी प्रथा श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळ नार्वेकर गल्लीचे भक्तगण आजतागायत जोपासत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article