Ad imageAd image

वीज धक्क्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू

Ravindra Jadhav
वीज धक्क्याने कंत्राटी वायरमनचा मृत्यू
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खानापूर : विद्युत खांबावरील वीज वाहिन्या जोडत असताना विजेचा धक्का बसल्याने खांबावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या एका कंत्राटी वायरमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खानापूर तालुक्यातील निलावडे ग्रामपंचायत व्याप्तीतील, आंबोळी येथे रविवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. रात्री 11.40 च्या सुमारासत्याचा मृत्यू झाला.
मंजुनाथ बसाप्पा कुरबर ( वय 19 ) राहणार काद्रोळी तालुका कितुर, जिल्हा बेळगाव असे मृताचे नाव आहे.

कणकुंबी, जांबोटी परिसरात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे या भागातील अनेक खांब उन्मळून पडले असून परिसरातील गावांमध्ये, चार-पाच दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता. निलावडे गावात बारा वर्षातून एकदा यात्रा भरते. या यात्रेसाठी खांबांची उभारणी आणि विद्युत वाहिनींच्या जोडणीचे काम, गेल्या दोन दिवसापासून सुरू होते. रविवारी सायंकाळपर्यंत निलावडे ग्रामपंचायत क्षेत्रातील आंबोळी, कान्सुली परिसरात वीज वाहिनी जोडण्याचे काम सुरू होते. वीज वाहिन्या जोडत असताना, अचानक विजेचा प्रवाह सुरू झाला आणि, विद्युत खांबावर चढलेल्या मंजुनाथ कुरबर, याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो खांबावरून खाली पडला व गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बेळगाव येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराचा उपयोग झाला नाही. रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article