Ad imageAd image

मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज : प्रतापसिंह चव्हाण यांनी केले मत व्यक्त : म्हणाले, ‘ मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने होतो विचारांचा पाया पक्का

Ravindra Jadhav
मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज : प्रतापसिंह चव्हाण यांनी केले मत व्यक्त : म्हणाले, ‘ मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने होतो विचारांचा पाया पक्का
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत शिक्षणप्रेमी प्रतापसिंह चव्हाण यांनी व्यक्त केले.
मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विचारांचा पाया पक्का होतो तसेच आपल्याला अभिव्यक्त होता येते, असेही ते म्हणाले.

राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ मातृभाषेतून शिक्षण ‘ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात त्यांनी उपरोक्त विचार मांडले.

मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, मालोजी अष्टेकर, इंद्रजीत मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत सुभाष ओऊळकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख गौरी चौगुले यांनी करून दिली. प्रास्ताविक इंद्रजीत मोरे यांनी केले. यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून पूर्ण केलेल्या व बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण झालेल्या प्रणव पाटील, सायली तुपारे, संजना पाटील, प्रणय पाटील, विजय देसाई व सौजन्य जत्राटी या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रबोधिनीचे सदस्य सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, प्रा. सुरेश पाटील, नीला आपटे, नारायण उडकेकर, गजानन सावंत इतर सर्व सदस्य, शिक्षक, मराठी प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले तर हर्षदा सुंठणकर यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article